निंभोरा पोलिसांकडून खिर्डी परिसरात अवैध दारूचा साठा जप्त.

निंभोरा पोलिसांकडून खिर्डी परिसरात अवैध दारूचा साठा जप्त.
  
  खिर्डी (प्रतिनिधी) –
              निंभोरा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी लॉकडावुन च्या काळात  खिर्डी, ऐनपूर व निंभोरा बुद्रुक याठिकाणी धड़क कार्यवाही करत अवैध धंद्यांवर  धाड़ टाकून हजारो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
             याबाबत सविस्तर्  वृत्त असे की, ऐनपूर  हद्दीतील ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावरील चिंचफाट्याच्या पुढे संकेत धाब्याच्या आडोशाला मधुकर प्रभाकर ठाकूर (वय 30 ) रा. खिर्डी बुद्रुक ता. रावेर  हे  देशी –विदेशी  कंपनीच्या 6922/- रुपये किमतीच्या  सीलबंद बाटल्यांची चोरटी विक्री विनापास, परवाना करताना मिळून आल्याने तसेच,  खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ऐनपुर रस्त्यावरील ब्रम्हा ढाब्याच्या आडोशाला ब्रम्हानंद छगन जयस्वाल (वय 41) रा. खिर्डी बुद्रुक  हा 3330/- रुपये किमतीची विदेशी दारूची विक्री स्वतःच्या फायद्यासाठी करत असताना मिळून आला .तसेच खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ते ऐनपूर रस्त्यावरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढे असणाऱ्या  भाऊ ढाब्याच्या आडोशाला चंद्रकांत जयराम कोळी ( वय 30 )रा. जळगाव तालुका जळगाव हल्ली मुक्काम वाघाडी यांनीसुद्धा 2665 रुपये किमतीची विदेशी दारूची चोरटी विक्री स्वतःच्या फायद्यासाठी करत असताना मिळून आले आहे. असे एकूण 12 हजार 970 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 व कोरोना अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सो.जळगाव यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून भा.द.वि. कलम 188,269 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तसेच निंभोरा बुद्रुक गावातील भरत रमेश महाले वय 27 व निलेश संतोष कोळी वय 24 रा.निंभोरा बु.यांनी देखील त्यांच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू अनुक्रमे 15 लिटर सहाशे रुपये किमतीची व वीस लिटर आठशे रुपये किमतीची दारु कब्जात बाळगून चोरटी विक्री करत असताना मिळून आले आहे. म्हणून त्यांचे विरोधात निंभोरा पोलीस स्टेशन येथे वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कार्यवाही ही सपोनि स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश वराडे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वकर चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश सूर्यवंशी,पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक स्वप्नील पाटील व होमगार्ड योगेश फालक यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments