सावद्यात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावे- आ. चंद्रकांत पाटिल यांचेकड़े शिवसेनेची मागणी

 सावद्यात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावे- आ. चंद्रकांत पाटिल यांचेकड़े शिवसेनेची  मागणी

आवाज परिवर्तनाचा वृत्त–

फैजपूर ता. यावल / प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सावदा शहर व परिसरात ऑक्सीजन ची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत असून आ.चंद्रकांत पाटील यांनी आमदार निधीतून ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सावदा येथील शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

         मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात नगरपालिका असलेले सावदा हे एकमेव शहर असून रावेर तालुक्यातील  केळीची सर्वात मोठी  बाजारपेठ आहे.  त्या अनुषंगाने  परिसरातील जवळपास पन्नास गावांच्या लोकांची वर्दळ  या शहरांमध्ये असते.  एक ना अनेक अशा कारणांसाठी  ही बाजारपेठ गजबजलेली असते  आणि यातच  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  हा  या बाजारपेठेसाठी  फार मोठी समस्या बनला आहे.  सावदा न.पा.क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण नव्याने सुरू झालेल्या ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका यांच्या माध्यमातून झपाट्याने एंटीजेन टेस्ट केल्या जात आहेत, त्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहेत. त्यापैकी काही रुग्ण घरीच उपचार घेत आहेत तर काही दवाखान्यात उपचार घेत आहेत.  सावदा शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सीजन सिलिंडर चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. आ.चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार असल्याने सावदा शहरासाठी आमदार निधीतून किंवा इतर निधीतून ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आ.पाटील यांना इमेल द्वारा निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख भरत वसंत नेहेते, उपतालुकाप्रमुख धनंजय वासुदेव चौधरी, शाम वसंत पाटील, तालुका क्षेत्रप्रमुख मिलिंद सुरेश पाटील, सचिव शरद गिरधर भारंबे, गौरव दिलीप भेरवा इ.शिवसैनिकांनी सह्या केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments