राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयातील पहिली प्रसुती सुखरूप

आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 सावदा ( प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा येथे बांधलेल्या राजश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात पहिली प्रसूती सुखरूप झाली. कित्येक वर्षापासून सावदा येथील नगरपालिका अंतर्गत येणारे सरकारी रुग्ण रुग्णालय बंद पडलेले होते. परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आले.व या ग्रामीण रुग्णालयातील पहिली महिला प्रसूती झाली. यावेळी डॉ. सचिन पाटील व डॉ. श्रुती एस टोके यांनी सुखरूप अशी प्रसुती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने केली.बाळाचे वडील इलियास खान अय्युब खान व आई जरिना बी इलियास खान शेखपूरा सावदा येथील असून त्यांनी डॉ.  व संपूर्ण स्टॉप यांचे आभार मानले.

येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बंद असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झाले होते.  यावेळी खासदार रक्षा खडसे,  माजी मंत्री आ एकनाथ खडसे,आ चंद्रकांत पाटील सह परिसरातील लोकप्रतिनिधी नागरिक उपस्थित होते. 

    सध्या या ग्रामीण रुग्णालयात  मशिनरी सह संपूर्ण स्टॉप कार्यरत असून रुग्णालयात आता प्रस्तुती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे व रुग्णांना आजारपणावर उपचार सुद्धा सुरू असून आजारानुसार ऍडमिट करण्याची व्यवस्था  सुद्धा असून परिसरातील व शहरातील रुग्णांनी राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा लाभ घ्यावा.

0/Post a Comment/Comments