जळगाव जिल्ह्यात सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार

आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 ( प्रतिनिधी  : करण तायडे)
      भारतीय कापूस महामंडळ अंतर्गत जामनेरसह भुसावळ, चोपडा व बोदवड, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, शेंदुर्णी, धरणगांव व पाचोरा या ठिकाणी 11 कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता.

11 केंद्र सुरू करण्याची मागणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रावेर लोकसभा अंतर्गत 11 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे मागणी केली होती. या अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत चार केंद्रासह पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, शेंदुर्णी, धरणगांव व पाचोरा येथे मिळून एकूण 11 केंद्र लवकरच सुरू होणार आहे.

0/Post a Comment/Comments