सिद्धार्थ गौतमाला पाहिल्यावर असितमुनीं म्हणाले " निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरूष अवतरला आहे."- सुमंगल अहिरे

               
               अतुल्य वर्षावास-०७ 
  आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 सावदा प्रतिनिधी -
                      "असित मुनींचे आगमण पुढे सुरु..." बालक जागे झालेले पहाताच शुध्दोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर गेले. असितमुनींनी त्या बाळाला निरखून पाहिल्यावर ते बालक महापुरुषाच्या ३२ लक्षणांनी आणि ८० अनुलक्षणांनी युक्त दैदीप्यमान असलेले त्यांना दिसले. असितमुनीं म्हणाले " निस्संदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. त्यानंतर ते आपल्या आसनावरुन उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला सांष्टाग नमस्कार घातला.त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली.आणि त्याला आपल्या हातात.घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित मुनिंला पूर्वीची सुपरिचित अशी भविष्यवाणी माहिती होती. "जर हा संसारात रममाण झाला तर चक्रवर्ती सम्राट होईल; पण जर गृहत्याग केला तरतर तो सम्यक संबुध्द होईल." असितमुनी त्या बालकाकडे पाहून ते रडू लागले . ते पाहून शुध्दोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.राजाने रडण्याचे कारण विचारले.असितमुनीं म्हणाले राजा! मी बालकासाठी नाही स्वतःसाठी रडत आहे. राजा! तुझे बालक " ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी....मध्य ....आणि अंतीम "कल्याणकारक" असेच असेल ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपुर्ण.,परिशुध्द आणि पवित्र असेच असेल." "परंतु मी त्या बुध्दाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडत आहे" .कारण मला त्या बुध्दाची पूजा करावयास मिळणार नाही.तद्नंतर राजाने त्या थोर असितमुनींला व त्याच्या पुतण्याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले . त्यांना वस्रदान देऊन प्रदक्षिणा घालून वंदन केले.तेव्हा असितमुनी पुतण्याला म्हणाले "नरदत्ता! जेव्हा हे बालक सम्यक संबुध्द होई त्यावेळी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर.ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल." असे म्हणून असितमुनीनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले.
 संकलन- सुमंगल तथा रविंद्र अहिरे 
                वरिष्ठ केंद्रीय शिक्षक 

0/Post a Comment/Comments