सिध्दार्थ गौतमाच्या नामकरण विधीचा आनंदी सोहळा

       
       अतुल्य वर्षावास-०९
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 सावदा प्रतिनिधी -
   सिध्दार्थ गौतमाच्या नामकरण विधीचा आनंदी सोहळा सुरु असतांना व सर्वच जण आनंदात असतांना माता महामायेचा आजारपणाने मृत्यू झाला.(ज्या कुशीत बोधीसत्वाचा गर्भ वाढला ती माता जास्त दिवस पृथ्वीतलावर रहात नाही) तेव्हा सिध्दार्थ फक्त सात दिवसांचा होता.सिध्दार्थाला नंद नावाचा एक लहानभाऊ होता.नंद हा शुध्दोधन आणि महाप्रजापती गौतमी यांचा पुत्र होता.सिध्दार्थाला अनेक चुलतभाऊ, आतेभाऊ होते.त्यांच्या सोबतीतच सिध्दार्थ लहानाचा मोठा झाला.वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणक्रम सुरू झाला.ज्या आठ ब्राम्हणांनी " माता महामायेच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट केला होता," ते सिध्दार्थाचे प्रथम गुरू होते.उदिच्च देशातील विव्दान घराण्यातील विव्दत्तासम्पन्न व उच्चकुलोत्पन्न " सब्बामित्त" हा दुसरा गुरू होय. सब्बामित्ताकडून सिध्दार्थाने त्याकाळी प्रचलित अश्या सर्व दर्शनशास्राचे अध्ययन केले.तर "आलारकालामचा" शिष्य "भारव्दाज*" *कडून सिध्दार्थाने चित्ताची एकाग्रता आणि समाधी यासंबंधी प्रशिक्षण प्राप्त केले. याशिवाय मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करुन देतांना क्षत्रियाला साजेशा अशा सैनिकी शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आलेले नव्हते.
 
संकलन-  सुमंगल तथा रविंद्र अहिरे 
 

0/Post a Comment/Comments