आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क
सावदा प्रतिनिधी -
मिलिंद भवार स्वतः ला पँथर म्हणवत असले,तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची या निवडणूकित त्यांनी चोखपणे चाकरी बजावली. 'प्रकाशाच्या अंधारवाटा' लिहून आपण अजूनही लाचारी आणि आगतीकता सोडायला तयार नाही.त्यातल्यात्यात आपण काँग्रेसची गुलामी करतच राहू,हा संदेशच त्यांनी या निवडणुकीत दिल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.खरं तर पँथर हा डरकाळी फोडणारा असतो ; मात्र तो लाळ घोट्याही असतो,हे प्रथमच मिलिंद भवारच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवले.
ऐन निवडणुकीत असे लाळघोटे रात्रीतून तयार होत असतात,हे आंबेडकरी राजकारणाला नवे नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतही असे लोक होतेच.बाबासाहेब स्वाभिमानाची लढाई लढत होते तर
काजोळकर,बोरकर,जगजीवनराम या सारखे लोक काँग्रेसच्या दारी स्वतः ला कुत्र्यासारखे बांधून घेत होते.आणि चोखपणे काँग्रेसच्या दाराची (घरात कुत्र्यांना प्रवेश नसतो) राखण करीत होते.आता राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन नव्या घरांची दारे राखण करण्यासाठी मिलिंद भवार,सुनील खोब्रागडे सारख्या लोकांना कामे मिळाली आहेत. राज्यात ३० वर्षे भाजप वाढविणारी शिवसेना संविधान आणि लोकशाही वाचवेल,असे या राखनदारांना वाटते. एका पोस्ट मध्ये तर मुस्लिम मतदार यांनी मागचं सगळं विसरून शिवसेनेला भक्कम स्थान दिल्याचा मिलिंद भवार डांगोरा पिटतात तर आंबेडकरी समाज १९५२-१९५६ चा अर्धवट इतिहास धरून बसल्याचा शोध लावतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेला कोणताही इतिहास आंबेडकरी समाज तो कसा विसरेल? बाबासाहेब आंबेडकर आमचे उध्दारकर्ते आहेत,मिलिंद भवार सारख्या लाचार आणि लाळ घोट्याला ते कसे कळेल?
संविधान सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रोखणे, दोन वेळा लोकसभेत पाडणे,भारतरत्न 'किताब न देणे,संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र न लावणे,बौद्धांना केंद्रात सवलती न देणे,या काँग्रेसच्या ऐतिहासिक चुका विसरून काँग्रेसच्या पाठीशी आंबेडकरी समाजाने उभे राहावे,असा आग्रह धरणे म्हणजे आपले राजकीय आकलन अतिशून्य आहे,असाच त्याचा अर्थ होतो. काँग्रेस कधीपासून पुरोगामी झाली?
काँग्रेसचा कुठलाही नेता भाजप मध्येच का जातो? याचे उत्तर मात्र काँग्रेसची तळी उचलून धरणारे देत नाहीत.
वंचितबद्दल मिलिंद भवार,सुनील खोब्रागडे यांना खुप राग आहे.वंचितने आपले उमेदवारच उभे करू नये,असे दोघांना याना वाटते. मात्र, अकोल्यात काँग्रेसने आर एस एस चा उमेदवार का दिला? या बाबत चकार शब्द काढत नाहीत.सगळ्यात तिळपापड झाला मिलिंद भवार यांचा तो वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या वंचितच्या उमेदवारी वरून. उज्ज्वल निकम या भाजपच्या उमेदवाराबद्दल मिलिंद भवार बोलू शकतात ; मात्र खैरलांजी प्रकरणी काँग्रेस,राष्ट्रवादी पक्षांच्या सरकारनेच उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती, आणि याच गावाला राष्ट्रवादीचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तंटा मुक्त गावाचा पुरस्कार दिला होता,या बाबत मिलिंद भवार बोलत नाहीत.
आंबेडकरी समाज हा चिकित्सक असतो, असं म्हणतात ; मात्र मिलिंद भवार,सुनील खोब्रागडे सारखे लोक,हा समज पायदळी तुडवतांना दिसून येतात.सोयीनुसार चिकित्सा करायची आणि कुणाची तरी चाकरी करत बसायची.कधी कधी वाटते आपल्या रक्तातील लाचारी आंबेडकरी विचार अंगिकारूनही काही केल्या जात नाही ; ती मिलिंद भवार,सुनील खोब्रागडे यांच्या रूपाने अधून मधून डोके वर काढत असते.
त्यामुळे आंबेडकरी समाज सुनील खोब्रागडे,मिलिंद भवार यांच्यासारख्या चाकरी करणाऱ्या आणि प्रकाशाच्या वाटेवरच्या रातकिड्यांच्या भूलथापांना बळी पडेल,या भ्रमात कुणी राहू नये.
Post a Comment