महिलांच्या व सर्व सामान्य जनतेच्या विविध समाजाच्या लोकांनी मुसळधार पावसात निळे निशान संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने रावेर तहसीलदार कार्यालयावर धडकला मोर्चा


 प्रतिनिधी करण तायडे ) रावेर शहरात गांवपातळी वरून तालुक्याच्या ठिकाणी सर्व सामान्य महिलांना तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन व बँकेच्या कामा निमित्त अनेक तास थांबावे लागते त्यामुळे

जेव्हा महिलांना नैसर्गिक रित्या लघुशंकेला जायचे असल्यास त्यांच्या समोर हि खुप मोठी समस्या निर्माण होते कि जायचे तर जायचे कुठे या संदर्भात आम्ही वारंवार रावेर नगर पालिकेला निवेदन दिले परंतु रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या भावना महिलांच्या प्रती बोयट झालेल्या आहेत तरी शासन प्रशासनाने महिलांच्या प्रती सहानभूती पुर्वक विचार करून रावेर शहरात ठिक ठिकाणी नगर पालिकेने प्रसाधन गृह

उभारावे याकरिता आदेश दयावे २) रावेर तालुक्यातील विधवा परितक्ता घटस्पोटीत महिला तसेच नैत्रहिन दिव्यांग व निराधार यांना

तात्काळ अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्यांना धान्य पुरवठा करणे ३) रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजुर वर्ग असून काही लोकांना आजही हक्काचा निवारा नाही ग्रामीण

भागात अनेक कुटुंब बेघर भुमिहिन असून त्यांना शासनाने रहिवासा करिता हक्काची जागा उपलब्ध करून दयावी.
४) रावेर तालुक्यात प्रत्येक गांवात बौध्द समाजाच्या महिलांना हातभट्टी दारू मुळे जिवंत असतांना नरक यातना भोगाव्या लागत असून अनेक तरुण मुली अतिशय कमी वयात विधवा झालेल्या आहेत व होत आहेत तसेच अनेक वयोवृध्द आई वडिलांचा आधार नष्ट होत आहे अनेक लहान मुल - दिनांक अनाथ होत आहे आणि काही स्वार्थी लोक जे पैसा कमावण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारू तयार करून बौध्द वाडया वस्तीत विक्री करत आहे रावेर तालुक्यात भोकरी, वाघोदा बु॥ उदळी निर्भोरा या गावांमध्ये अनेक लोक जाणीवपुर्वक विषारी द्रव्यांचा वापर करून हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावांमध्ये बौध्द समाजाच्या वाडया वस्त्यांमध्ये पोहचवुन स्वार्थी लोकांना पैश्याचे अमिष देऊन विक्री करून घेत आहे तरी अश्या स्वार्थी लोकांविरुद्ध भारतिय न्याय संहितेचे कलम १२३ प्रमाणे कारवाई करण्यात यावी.

५) रावेर तालुक्यातिल वाघोदा उदळी सुनोदा निभाँरा येथे दलित समाजाच्या महिलांकरिता शौचालय नाहीत तरी संबंधीत ग्रामपंचायत जाणिव पुर्वक दुर्लक्ष करित आहे तरी वरिल नमुद असलेल्या गांवामध्ये तात्काळ शौचालय उभारण्यात यावे.

६) रावेर तालुक्यातिल प्रत्येक गांवात मोठ्या प्रमाणात मजुर वर्ग असून आरोग्या विषय ते सर्वस्वी ग्रामिण रुग्णालयावर अवलंबुन आहेत रावेर तालुका सव्वाशे गांवाचा असुन लोकसंख्या मोठ्याप्रमाणत आहे परंतु जेव्हा त्यांना औषधोपचाराची गरज भासते तेव्हा आवश्यक असे उपचार होत नाही त्यामुळे रावेर ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा.

७) रावेर तालुक्यातिल ऐनपुर गांवात गेल्या महिन्यात अनेक ठिकाणि महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते त्या बॅनर वर अनेक महापुरुषांचे फोटो असतांना जातियद्वेषा पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर काही जातियवा‌द्यांनी चिखल लाऊन बौद्ध समाजाच्या भावना भडकविण्याच्या तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे घाणेरडे कृत्य केले आहे तरी तात्काळ त्या जातियवाद्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करावी.

या विषयावर सहानभूती पुर्वक विचार करून महिलांना व सर्व सामान्य जनतेला न्याय दयावा अन्यथा संघटनेच्या महिला आघाडीच्या वतिने आपल्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन व अमरण उपोषण करण्यात येईल. असे निवेदन निळे निशाण संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले.

0/Post a Comment/Comments