रावेर तालुक्यातील चिनावल सुकी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी तहसील अधिकारांचे दुर्लक्ष

 



प्रतिनिधी करण तायडे                                        
 रावेर तालुक्यातील चिनावल कुंभारखेडा सुकी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुकीला ऊत आला असून रावेर तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये भीती संपल्याचे चित्र दिसत आहे   सुकी नदी पात्रातून पहाटे चार ते संध्याकाळी सातच्या दरम्यान नदीपात्रातून अवैधरतीच्या ट्रॅक्टरे उतरवून सर्रास अवैध वाळूची वाहतूक केली जाते आहे या वाळू चोरट्यांचा धुमाकूळ थांबता थांबेना झाला आहे यांना  तहसील  अधिकाऱ्यांचा संपलेला वाचक कारणीभूत दिसत  आहे तसेच चिनावल तलाठी  यांच्या दुर्लक्षतामुळे यातून मोठ्या प्रमाणात सुकी नदीची  वाळू अवैधरित्या वाघोदा रावेर  सावदा अशा आजूबाजूच्या खेड्यांवर  नेऊन मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे  या संदर्भात  चिनावल तलाठी  आणि  सावदा पोलीस प्रशासन व रावेर तहसील प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे  नैसर्गिक मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचं काम  वाळू चोर करत आहे लवकरात लवकर तहसीलदारांनी याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा बाळगतो

0/Post a Comment/Comments