अतुल्य वर्षावास -०८
आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
सावदा प्रतिनिधी -
महामायेचा मृत्यू ...पाचव्या दिवशी नामकरणविधी करण्यात आला मुलाचे नांव "सिध्दार्थ"असे ठेवण्यात आले. समारंभ सुरु असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावु लागले,आपला अंतकाळ जवळ आला असे समजुन महामायेने शुध्दोधन व महाप्रजापती गौतमी हिस जवळ बोलावले आणि म्हटले" माझ्या मुलाबद्दल असितमुनींनी जे भविष्य वर्तविले ते खरे होईल याचा मला विश्वास आहे.मला दुःख ऐवढेच वाटते की.ते खरं झालेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही."माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल! पण माझ्या मागे त्याची योग्य प्रकारे जोपासना होईल. "प्रजापती! माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे ." त्याच्या आईपेक्षाही तु त्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करशील याबाबतीत मुळीच शंका वाटत नाही.आता कष्टी होवु नका.दुत मला घेण्यासाठी थांबले आहेत.असे म्हणून महामायेने प्राण सोडला.सिध्दार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेंव्हा तो सात दिवसांचा होता
संकलन- सुमंगल तथा रविंद्र अहिरे.
Post a Comment