डॉ .बाबासाहेब आंबेडकर लिखीत "भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म" म्हणजे मानवी कल्याणाचा मध्यम मार्ग होय - सुमंगल अहिरे गुरुजी

          
            अतुल्य वर्षावास-०५  
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क 
 सावदा प्रतिनिधी -
                राजा शुध्दोधन आणि महामायेचा विवाह होऊन बरीच वर्षे लोटली होती, परंतु त्यांना संतान नव्हते. महामायेला जे स्वप्न पडले ते सकाळी तिने राजा शुध्दोधन यांना सांगितले.मला मुलबाळ नाही, त्यामुळे स्वप्नात कुणीतरी माझी चेष्ठा केली.राजा शुध्दोधन यांनी स्वप्न विद्देत पारंगत अश्या आठ ब्राम्हणांना राजदरबारात बोलावून घेतले.त्यांना भरपूर दान दिले व महामायेला रात्री पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काय?याबाबतीत विचारणा केली..त्या आठ ब्राम्हणांनी स्वप्नाचा अर्थ सांगितला.." हे राजन !!! महामायेच्या पोटी जो पुत्र जन्माला येणार आहे .तो संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल..व गृहत्याग करुन सन्यासी झाला तर सम्यक संबुध्द होईल." महामायेने सिध्दार्थाचा गर्भ दहा महिने आपल्या कुशीत वाढविला. त्यानंतर बाळंतपणासाठी आपल्या माहेरी देवदह नगरी येथे जाण्यासाठी राजाला सांगितले.राजाने राणी महामाया यांची माहेरी जाण्याची सर्व तयारी करुन दिली. महामाया आपल्या नोकर चाकरासह आपल्या माहेरी निघाली .नेपाळच्या तराई मध्ये "लुबीनी" नावाचे जे वन आहे. त्या वनात महामाया आली..वनातील सौदंर्य पाहून या ठिकाणी थांबण्याची इच्छा प्रकट केली..तेथे थांबल्यानंतर वनातील शाल वृक्षाची फांदी तीने हातात धरली. त्यानंतर ती फांदी हवेच्या झोकाने वर गेली.त्यातच महामाया प्रसुत झाली.पुत्ररत्नाचा लाभ झाला.त्या वनांत वैशाख पौर्णिमेला जेंव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा शुध्दोधन,त्यांचे कुटुंब आणि समस्त शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला. सध्या नेपाळ राज्यात हे लुंबीनी आहे."आपण धम्मयात्रेला आपल्या जिवनात कधीही गेला तरी आपणांस हे ठिकाण आजही पहाता येईल.आपण अवश्य भेट द्यावी जिवनात एकदा तरी लुबींनीला भेट द्यावी. "पुत्र जन्माच्यावेळी कपिलवस्तुचे राजपद भुषविण्याची पाळी राजा शुध्दोधनाची होती.अर्थातच त्यामुळे शुध्दोधनास "राजा" म्हणत असत.आणि त्या बालकास "युवराज"म्हणून संबोधण्यात येऊ लागले. बालकाच्या जन्माच्या ५ व्या दिवशी नामकरण विधी संस्कार करण्यात आला. बालकासाठी "सिध्दार्थ" हे नाव निवडले गेले व तेच नाव ठेवण्यात आले बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोकांत तो " सिध्दार्थ गौतम" म्हणून प्रसिध्द झाला,
  संकलन- सुमंगल तथा रविंद्र अहिरे
     वरिष्ठ केंद्रीय शिक्षक

0/Post a Comment/Comments