आवाज परिवर्तनचा न्यूज नेटवर्क :
सावदा प्रतिनिधी:-
'सम्राट फाऊंडेशन सावदा' संचलित "सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल वढोदे प्र.सावदा ता.यावल" या शाळेत आज ५ सप्टेंबर "शिक्षक दिवस" निमित्ताने "शिक्षक कृतज्ञता सोहळा" कार्यक्रम संपन्न झाला.
गुरु समान दाता नहीं, याचक नाही शिष्य समान!
तीनों लोक की संपदा, सो गुरु दीन्ही दान!!
संत कबीर यांच्या वरील दोह्याप्रमाने गुरु सारखा कोणीच दाता नाही आणि शिष्य समान कोणी याचक नाही. गुरु हा या जगात आपल्याला तिन्ही लोक च्या संपत्ती पेक्षाही श्रेष्ठ असे ज्ञानाचे दान देत असतात. अशा या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज शाळेत "शिक्षक दिवस कृतज्ञता सोहळा" चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामणोद केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सलीम तडवी सर हे होते तर विशेष अतिथी म्हणून धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर चे ग्रंथपाल प्रा. डॉ. इबरा गायकवाड सामाजिक कार्यकर्ता तथा मानद सदस्या आयु. शमिभा पाटील ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर चे उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. मनोहर सुरवाडे सर हे होते तसेच विशेष पाहुणे म्हणुन सम्राट फाउंडेशन सावदा चे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर, सामाजिक समता मंच रावेर चे अध्यक्ष राजुभाऊ सवर्णे, ॲड.राजकुमार लोखंडे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालक यांना शिक्षक दिनानिमित्ताने मार्गदर्शन केले तसेच यावेळी "सम्यक ज्ञान स्पर्धा परीक्षा- ऑगस्ट 2024", "स्टुडन्ट ऑफ द मंथ ऑगस्ट - 2024", मध्ये विजय विद्यार्थी यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र तसेच शाळेला वस्तू स्वरूपात मदत करणाऱ्या दात्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान, बदलत्या काळानुसार बदललेले शिक्षण पद्धतीचे स्वरूप आदीं विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी केक कापून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
Post a Comment