अतुल्य वर्षावास-१०
आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
सावदा प्रतिनिधी -
दंण्डपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती.ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्राविषयी प्रसिध्द होती.यशोधरा सोळा वर्षाची झाली.दण्डपाणी तिच्या विवाहाचा विचार करु लागला प्रथेप्रमाणे आसपासच्या राज्यात कन्येच्या स्वंयवरा प्रित्यर्थ सर्व राजपुत्रांना निमंत्रणे पाठविली.सिध्दार्थ गौतमालाही आमंत्रित करण्यात आले.या वेळी यशोधराने उपस्थितीत युवासमुदायातून सिध्दार्थ गौतमाची निवड केली. मात्र कुठलीही स्पर्धा न घेता केलेल्या या निवडीबद्दल उपस्थितीत राजपुत्रांनी आक्षेप घेत; एक तरी स्पर्धा घेण्यात यावी असाआग्रह धरला.या वेळी घेण्यात आलेल्या धनुर्विद्घेच्या परिक्षेत राजपुत्र सिध्दार्थ गौतमाने सर्वश्रेष्ठ कौशल्य प्रस्तुत करीत उपस्थितांचे मने जिकून घेतली.आणि अश्या रितीने यशोधरा आणि सिध्दार्थाचे स्वयंवर "विवाह" संपन्न झाला.या विवाहाने दण्डपाणी, शुध्दोदन, महाप्रजापती आनंदीत झाले. विवाह नंतर अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरा ला पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव 'राहूल 'असे ठेवण्यात आले
संकलन- सुमंगल तथा रविंद्र अहिरे
वरिष्ठ केंद्रीय शिक्षक
Post a Comment