आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
सावदा (प्रतिनिधी ):
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज सावदा शहर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला. ३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला चांगलेच धारेवर धरलं होते. या सर्व प्रकरणात राजकीय वातावरण तापलं असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेच्या विरोधात आज शहर महाविकास आघाडी तर्फे सावदा पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन नोंदविण्यात आला. या घटनेचा निषेध केला जाणार आहे.
शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट दोघांवर गुन्हा दाखल असला तरी दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनावर भरत नेहते, शिवसेना शहरप्रमुख (उबाठा ), गौरव भैरवा, श्याम पाटील, शरद भारंबे, धनंजय चौधरी, जगदीश बढे, अतुल नेहते, पंकज येवले,( माजी संचालक, कृउबा, रावेर ) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर प्रमुख, एकलव्य कोल्हे, सय्यद अजगर सय्यद तुकडु,,( संचालक, कृउबा, रावेर ) राष्ट्रवादी मुराद तडवी, रवींद्र बेंडाळे,( काँग्रेस पदाधिकारी) राहुल रवींद्र पाटील, धीरज करोशिया, सुनील एकनाथ राणे, मिलिंद सुरेश पाटील,(ऊबाठा गट ) मनीष परदेशी यांच्या सह्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षांपूर्वी बांधलेले गड-किल्ले आजही दिमाखात उभे असून जराही हललेले नाहीत. ऊन, वारा, समुद्राच्या लाटा झेलणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे गड-किल्ले आजही अभेद्द आहेत आणि त्यांचा पुतळा वाऱ्याने कोसळतो? हे अतिशय निंदनीय आहे. अतिशय खराब सामग्रीने हा पुतळा बांधण्यात आला होता का? महाराजांचा पुतळा बांधताना इतका हलगर्जीपणा कसा केला जातो? असे अनेक संतप्त सवाल विरोधकांसह शिवप्रेमींमधूनही विचारले जात आहेत.
भारत देशाचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता विचारात घेत हा पूर्णाकृती पुतळा सुरक्षित आणि सुस्थितीत उभारण्याच्या दृष्टीने बनवणं आणि त्यासंदर्भात सर्वोतोपरी काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. मात्र पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष करुन निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्यात आला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. भविष्यात असे प्रकार होणार नाही याची खबरदारी ही सरकारने घ्यावी अशा भावना ही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या. व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
Post a Comment