सिद्धार्थ गौतमाला पाहिल्यावर असितमुनीं म्हणाले " निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरूष अवतरला आहे."- सुमंगल अहिरे

              
              अतुल्य वर्षावास ०६
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 सावदा प्रतिनिधी - 
              "असित मुनींचे आगमण" ज्या वेळी या बालकाचा जन्म झाला, त्यावेळी हिमालय पर्वतावर असित नावाचे एक महान तपस्वी ऋषी रहात होते.असितमुनींनी पाहिले की,अंतरिक्षातील देव (सज्जन माणसं ) "बुध्द" या नावाचा जयघोष करीत आहे .ज्या ठिकाणी बुध्दांनी जन्म घेतला त्या ठिकाणी आपण का? जावू नये,म्हणून तो महान तपस्वी ऋषी आपल्या आसनावरुन उठला व त्याने आपला पुतण्या "नरदत्त "याला बरोबर घेऊन कपिलवस्तु नगरीच्या दिशेने निघाला .. राजा शुध्दोधनाच्या राजवाड्याच्या प्रवेश व्दारापाशी आला. व्दारपालाने ते पाहिले व राजा शुध्दोधनास ही वार्ता सांगितली.राजा म्हणाला "जा आणि सन्मानपुर्वक त्यांना घेऊन या" व्दारपालाने अत्यंत सन्मानपुर्वक ऋषी असितमुनी यांना राजवाड्यात नेले. महानतपस्वी असितमुनीं आसनस्थ झाल्यावर म्हणाले "राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे". तुझ्या पुत्राला पहाण्यासाठी मी आलो आहे.राजा शुध्दोधन म्हणाले मुनिवर तो (बाळ) झोपला आहे.ऋषी म्हणाले "राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही." आणि तिकडे बाळाने आपण जागृत आहोत हे दर्शविणारी हालचाल केली. असितमुनीं यांनी बाळाला पाहिले व बाळाला पाहिल्यावर असितमुनीं म्हणाले " निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरूष अवतरला आहे." 
 संकलन - सुमंगल तथा रविंद्र अहिरे 
                   वरिष्ठ केंद्रीय शिक्षक 

0/Post a Comment/Comments