व्हाईस ऑफ मीडियाची रावेर तालुका कार्यकारणी जाहीर अनोमदर्शी तायडे (सर) यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची निवड

आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
सावदा /प्रतिनिधी : रावेर तालुका व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. सावदा येथील विश्रामगृहावर दिनांक २९ वार बुधवार रोजी ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप वैद्य सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नाशिक विभागीय अध्यक्ष श्री.मिलिंद टोके यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रावेर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची ध्येय व धोरणे पत्रकारांपर्यंत पोहोचावी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी चालवलेल्या लढा नेटाने पुढे न्यावा असे सुतोवाच ज्येष्ठ पत्रकार श्री वैद्य सर यांनी केले. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल पोर्टलचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शामकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदर बैठकीत कार्यकारणी विस्तार, एक दिवशीय पत्रकार प्रशिक्षण, पत्रकारांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्याविषयी समस्यावर, पत्रकारांच्या पाल्यांच्या शैक्षणिक विषयक तथा पत्रकारांसाठी घरकुल योजने मार्फत घर मिळवून देणे याप्रमाणे पत्रकारांच्या विविध समस्या आदी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे व्हॉइस ऑफ मिडियाचे रावेर तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर, यांनी सांगितले. व्हॉइस मीडिया या पत्रकार संघटनेकडून पत्रकारांच्या हितासाठी मुख्य भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही कार्याध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली. याप्रमाणे तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली ..
अध्यक्ष - अनोमदर्शी तायडे (सर ), कार्याध्यक्ष -प्रवीण पाटील,
उपाध्यक्ष - विजय अवसरमल 
सचिव - गणेश रामा भोई, 
सहसचिव - युसूफ खाटीक, 
कोषाध्यक्ष -मुबारक तडवी,
 सदस्य-अनिल मानकरे, रवींद्र हिवरकर, साजिद शेख, राजेंद्र दिपके, भारत हिवरे, संजय चौधरी,मसुदखान सईदुल्ला खान, सुनील चौधरी,अजहर खान, शेख इंद्रिस शेख इस्माईल, आनंदा रामा भालेराव, सुरेश पवार
आदी,तथा जेष्ठ पत्रकार राजेंद्र भारंबे, पंकज पाटील,राजेश चौधरी, प्रदीप कुलकर्णी, राजेश पाटील आणि तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments