सावदा पोलिसांची श्रमदानातून परिसराची स्वच्छता. सपोनि विशाल पाटील यांनी सावदा शहर वासियांना केले स्वच्छते बाबत आवाहन.


आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क 
सावदा (प्रतिनिधी )
               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसीय ७ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी.
   मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या १०० दिवसांचा ७ कलमी कार्यक्रम अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो यांचे आदेशाने सावदा पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी हे दर शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पोलीस स्टेशनचा परिसर श्रमदान करून स्वच्छ करीत 


मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे ७ कलमी कार्यक्रमाची १०० दिवसात कार्यवाही करून पूर्तता करण्यासाठी पुढील रूपरेषा देण्यात आली असून पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांचे कडून आदेश देण्यात आले.

१) पोलीस ठाणे आवारात साफसफाई करून सर्व कचरा काढून टाकण्यात यावा तसेच पोलीस ठाणे आवारात कंपाउंड मध्ये हिरवळ वाढविण्यासाठी झाडें लावून प्रयत्न करावे.

२) बेवारस वाहनांची तसेच इतर वस्तूची विल्हेवाट लागत नसल्यास तात्पुरते सदर वाहने व इतर वस्तू अन्य ठिकाणी हलवली जावीत. गुन्ह्यातील वाहने व इतर मुद्देमाल निर्गती करणे करिता माननीय न्यायालयातून निकालाच्या प्रतिप्राप्त करून मुद्देमाल निर्गती करावी. तसेच पोलीस ठाणे अभिलेखावरील कालबाह्य रिपोर्ट नाश बाबत त्वरित कारवाई करण्यात यावी.

३) पोलीस ठाणे आवश्यक ज्या ठिकाणी रंग रोटी करणे आवश्यक आहे तेथे करण्यात यावी. तसेच विशेषतः कंपाउंड मधील गुटख्याचे डाग दिसणार नाही याप्रमाणे रंग रोटी करण्यात यावी.

४) स्टेशन रायटर / ठाणे अंमलदार रूमचे व्यवस्था चांगली आहे आणि चांगले वातावरण आहे याची खात्री करून त्यानुसार योग्य तो बदल करावा.

५) पोलीस अंमलदार आणि जनता या दोघांसाठी स्वच्छ (RO )पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

६) पोलीस स्टेशन कार्यालयाचे प्रवेशद्वार खराब स्थितीत असल्यास त्याचे स्वरूप सुधारण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात यावे तसेच साईन बोर्ड आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात यावेत व त्या ठिकाणी एक वाक्यता असावी.

७) पोलीस अंमलदार आणि जनता या दोघांसाठी पोलीस ठाणे आवारातील स्वच्छतागृहे चांगले स्थितीत आहेत अगर कसे त्यानुसार आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. तसेच सदर ठिकाणचे फरशा फ्लोअर किंवा कमोड खूप जुने असल्यास बदल करून घ्यावे. पोलीस ठाणे आवारातील शौचालय स्वतंत्र (स्त्री /पुरुष स्वतंत्र) युरीन कमोड बसवावेत.

सदर पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेल्या कामाचा आढावा दिनांक १६.१.२०२४ रोजी होणाऱ्या गुन्हे परिषदेत घेणार येणार असल्याचे अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशान्वये परिपत्रक काढण्यात आले.


0/Post a Comment/Comments