महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे : रावेर भारतीय बौद्ध महासभा व समस्त बौद्ध समाजाची मागणी

 


सावदा : प्रतिनिधी 

          महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार येथे अखिल भारतीय भिक्खू महासंघ व जागतिक भिक्खू महासंघ यांच्या माध्यमातून गेल्या एक महिन्याभरापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन छेडण्यात आलेले आहे. संपूर्ण देशभरामध्ये ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने उभारली जात आहे. 

        त्याच पार्श्वभूमीवर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती सावदा व भारतीय बौद्ध महासभा तालुका रावेर यांनी सावदा येथे भव्य महामोर्चा चे आयोजन केलं होतं. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ स पो. नि विशाल पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

            बुद्धगया हा एक जागतिक वारसा म्हणून युनोस्कोने जाहीर केलेला आहे. 

 सदरील स्थळ हे बौद्धांचे अस्मिता स्थळ असून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून बुद्धगया या ठिकाणी भिक्खू संघाच्या माध्यमातून उपोषण सुरू असून उपोषणा दरम्यान कित्येक भिक्खूच्या तब्येती चिंताजनक झाल्या असून अजूनही शासनाने याबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही.

         बिहार शासनाने निर्माण केलेला, अत्यंत जटिल असा 1949 चा बीटी ॲक्ट तात्काळ रद्द करावा. व महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन भिक्खू संघाकडे देण्यात यावे.

      महाबोधी महाविहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली असून या ठिकाणाला विश्वात महत्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणावरून संपूर्ण जगाला शांतीचा असा करुणामय संदेश दिला जातो.

*================*

बोधगयेतील महाबोधी महाविहार वाद: बौद्धांच्या मागण्यांना न्याय का मिळत नाही?

      बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार विवाद हा एक जटिल आणि ऐतिहासिक विषय बनला आहे. या विवादाचे मूळ हे विहारावरील नियंत्रणाच्या वादात आहे, जो बौद्ध आणि ब्राह्मण समुदायांमध्ये फार पुरातन आहे.

       1891 मध्ये अनागरिक धर्मपाल यांनी महाबोधी विहारावर दावा केला, पण ब्राह्मण महंत यांच्याकडून विरोध करण्यात आला.

यानंतरच्या काळात बौद्ध समुदायाने विहाराच्या पुनर्निर्माणासाठी आणि त्यावरील नियंत्रणासाठी आंदोलन सुरू केले. परंतु यावेळी बिहार शासनाने 1949 चा बी टी कायदा अमलात आणला त्यामुळे या कायद्यानुसार महंतला विहाराच्या प्रबंधनात महत्त्वपूर्ण अधिकार दिले गेले, ज्यामुळे बौद्ध समुदायाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.

       महाबोधी विहार विवाद हा एक जटिल धार्मिक आणि सामाजिक मुद्दा आहे ज्याचे निराकरण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक सहकार्याची गरज आहे.

       भारतात बौद्ध पक्ष अनुत्तरित आहे आणि त्यांच्या दाव्यांना न्याय मिळत नाही, याचे एक उदाहरण म्हणजे बोधगयेतील महाबोधी विहाराचा वाद. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी स्पष्ट केले होते की, “मी हे सिद्ध करू शकतो की वैदिक काळात यज्ञाची संकल्पना होती, परंतु मंदिरांची परंपरा नव्हती. म्हणूनच कोणत्याही उत्खननात दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या वैदिक किंवा शैव/वैष्णव पंथांच्या मूर्ती सापडत नाहीत. फक्त इ.स. ७०० ते ८०० च्या काळातील मूर्ती आढळतात.” त्यामुळे ब्राह्मणांचा या विहारावरील ताबा हा अनधिकृत आहे हे सिद्ध होते.

         *अनोमदर्शी तायडे*

*================*

       यावेळी सुरुवातीला संघाच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेतले. त्यानंतर बी डी महाले, महेंद्र तायडे, उमेश गाढे, विजय अवसरमल, पंडित महाले, कामिनी तायडे, प्रतिभा मोरे व नंदाबाई लोखंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

      यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा तालुका रावेर चे सर्व बौद्धाचार्य पदाधिकारी व रावेर, यावल तालुक्यातील शेकडो धम्म उपासक उपासिका उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments