डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सावदेकरांचे आरोग्य धोक्यात?


 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
 सावदा प्रतिनिधी :
         पहाटे थंडी, दुपारी तप्त उन्हाचा कडाका कधी ढगाळ वातावरण शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे शहरात डासांच्या संख्येत वाढ झाली आहे.
 परंतु गेल्या काही दिवसापासून सावदा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू सदृश्य तापाची साथ झपाट्याने वाढत आहे . डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरपालिका आणि आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे . सावदासह परिसरात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ फैलावत आहे . ऋतुचक्रात होणारे वारंवार बदल यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा अचानक पणे ढगाळ वातावरण निर्माण होत असून त्यातून डासांच्या उत्पत्तीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. कारण थंड वातावरण डासांच्या उत्पत्तीस पोषक असे असते. दास वाढीसाठी पर्यावरणातील बदल सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत.
       शहराच्या चारही बाजूला कचर्‍याचा ढीग आणि त्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे . डास चावल्याने लहान मुलांना तापाची लक्षणे दिसून येत आहेत . काही रुग्ण जेव्हा खाजगी दवाखान्यात उपचार घेतात तेव्हा हा ताप डेग्यूचा असू शकतो असा निष्कर्ष काढला जात आहे . त्यावर रक्ताचे नमुने घेऊन तपासनी करीता पाठविले जात आहे . यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेने धूर फवारणी, औषध फवारणी करुन गटारे स्वच्छ करण्यावर भर देणे गरजेचे आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नियमित धूर फवारणी, औषध फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु धूर फवारणी करण्याकडे सावदा नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असेच सध्यातरी जाणवते.
       सध्याचे वातावरण डास उत्पत्तीस पोषक असेच आहे. सकाळी थंडीचा गारठा दुपारी कडाक्याचे ऊन तर रात्री ढगाळ वातावरण यामुळे शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. संध्याकाळी डासांचे जथ्थेच्या जथ्थे घरात शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. प्रभागात धूर फवारणी, औषध फवारणी करण्याविषयी नागरिक मागणी करीत असले तरी त्याचा काही एक उपयोग होताना दिसत नाही. पालिकेच्या आरोग्य विभाग याबाबतीत प्रचंड उदासीन दिसून येत आहे. आठवड्यातून किमान एक वेळेस तरी धूर फवारणी, औषध फवारणी अशा वेळेस तरी करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात नगरपालिका प्रशासन फवारणीविषयी उदासीन असल्याचे नागरिकांचा आरोप आहे. शहराचे बाहेरील भाग, नाला, झोपडपट्टी या भागांत डासांची झुंबडच्या झुंबड सायंकाळच्या वेळी पहावयास मिळत आहे. तसेच शहरी भागात घराच्या आवारात उभ्या केलेल्या गाडय़ा, साचलेले गटाराचे पाणी, कचरा यावर डासांची पैदास जास्त दिसत आहे. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घराचे दरवाजे, काचा खिडक्या सर्व बंद करून बसावे लागते. अन्यथा घरात डासांचा शिरकाव झालाच समजा, असा अनुभव शहरातील असंख्य रहिवासी यांनी सांगितला. कॉलनी भागात आठवडय़ातून एकदातरी धूर फवारणी किंवा औषध फवारणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्रत्यक्षात नियमित फवारणी होत नसल्यानेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments